धनगर समाज्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय ढोलच्या आवाजाने दणाणून गेले.
धनगर समाज्याला एस.टी. प्रवर्गाचा दाखला द्यावा या मागण्यांसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाज्याच्या वतीने अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत गंभीर नाही. त्यामुळे आज झोपचे सोंग घेवून बसलेल्या सरकारला जागे करण्यासाठी पोतराजाच्या भूमिकेत आसूड ओढत आंदोलन केले. यासाठी धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्र भर ढोल बजोओ सरकार जगाओ... अंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून आज औरंगाबाद मध्ये देखील धनगर समाज बांधवांच्या वतीने ढोल बजावो आंदोलन केले. यावेळी लवकरात लवकर धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचा दाखला द्यावा. त्याचबरोबर सरकारने 1000 कोटीचे पॅकेज त्वरीत द्यावे या मागण्या मांडण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी राहुल नरवटे, रामचंद्र नरवटे, संदीप घुगरे, दीपक महानवर, शिवाजी नेमाने, कैलास गायके, दादाराव साळवे, कैलास रिठे, राजू रिठेसह आदींनी सहभाग नोंदविला.